वैदिक काळातील स्त्रिया : गार्गी, मैत्रेयी आणि इतर महान ऋषिकांची कथा
- 4 days ago
- 5 min read

वैदिक काळातील स्त्रिया खरोखरच मौन होत्या का?
महिला दिनी बहुसंख्य चर्चा जिथे ‘सक्षमीकरण’ या शब्दाभोवती फिरतात, तिथे एक सामान्य समज आहे की प्राचीन काळात स्त्रियांना आवाज नव्हता. हा समज अनेकवेळा वैदिक काळावरही लागू केल्या जातात.
पण जर आपण थेट मूळ ग्रंथांकडे वळलो, तर चित्र थोडं वेगळं दिसतं. वैदिक काळातील स्त्रिया केवळ उपस्थित नव्हत्या, त्या ऋचांचे रचनाकार, तत्त्वज्ञ आणि सार्वजनिक शास्त्रार्थात सहभागी होत्या. त्यांच्या विचारांची नोंद वेदांच्या परंपरेत जतन झालेली आहे. म्हणूनच हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रंथाकडे परत जायचं आहे.
वेद म्हणजे काय - थोडक्यात संदर्भ
वेदकालिन महिलांचे कार्य पाहण्याआधी आपण वेद काय आहेत ते जाणून घेऊया.
वेद हे चार प्रमुख संकलन आहेत:
ऋग्वेद
यजुर्वेद
सामवेद
अथर्ववेद (या व्यतिरिक्त ४ उपवेद आहेत)
हे ग्रंथ दीर्घकाळ मौखिक परंपरेतून पाठ होऊन जतन झाले.
ऋग्वेदात तत्त्वमीमांसा व ऋचा आहेत.
यजुर्वेद यज्ञविधींवर मार्गदर्शन करतो.
सामवेद गायनासाठीच्या रचनांची रचना करतो.
अथर्ववेदमध्ये आरोग्य, नैतिकता आणि समाजजीवनाशी संबंधित मंत्र आढळतात.
वैदिक विचारधारेचा केंद्र म्हणजे ऋत (Rta), विश्वव्यवस्थेशी एकरूपता. आणि या चिंतनात स्त्रियांची उपस्थिती केवळ दर्शक म्हणून नव्हे तर सहभागी म्हणून दिसते. काही केसेसमध्ये त्यांना वैदिक शिक्षणदेखील मिळालेले दिसते.
वेदांमधील स्त्रिया कोण होत्या?
वेदांमधील स्त्रियांमध्ये ऋषिका (स्त्री ऋषी), ब्रह्मवादिनी (वेदांच्या अध्ययन आणि तत्त्वचिंतनाला समर्पित स्त्रिया) तसेच तत्त्वचर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या विदुषींचा समावेश होता. ऋग्वेद आणि उपनिषदांमध्ये स्त्रियांनी रचलेले सूक्त आणि त्यांच्याशी संबंधित संवाद आजही जतन झालेले आढळतात. यावरून असे दिसून येते की प्रारंभीच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक जीवनात स्त्रियांची सक्रिय उपस्थिती होती.
ऋषिका - ऋग्वेदातील महिला दृष्टिकोन
वैदिक काळातील स्त्रियांच्या बुद्धीवादी उपस्थितीचा ठोस पुरावा म्हणजे ऋषिकांची नोंद.
ऋषिका म्हणजे काय?
ऋषी म्हणजे ज्याने तत्त्वबोध करून तो शब्दरूप केला; स्त्रीलिंग रूप म्हणजे ऋषिका. ऋग्वेदातील काही ऋचा महिला रचनाकारांनी रचलेल्या आहेत आणि ही नोंद अनुक्रमणिकांमध्ये जतन आहे. हेच एका सामान्य समजाला पुरावा आहे ज्यांचे म्हणणे आहे की प्राचिन भारतामध्ये स्त्रियांना मत नव्हते.
काही प्रसिद्ध ऋषिका
लोपामुद्रा

लोपामुद्रा ऋग्वेदातील महत्त्वाच्या स्त्री आवाजांपैकी एक मानली जाते. तिचे आणि ऋषी अगस्त्य यांच्यातील संवादात्मक ऋचा गृहस्थ जीवन, संयम आणि आध्यात्मिकता यांवर चिंतन करतात.
घोषा

ऋषी कक्षीवत यांची कन्या घोषा हिने अश्विनी कुमारांच्या स्तुतीतील ऋचा रचल्या. तिच्या कवितांमध्ये भक्तीबरोबरच वैयक्तिक आशा आणि जीवनातील आनंदाची इच्छा दिसते.
अपाला

अपाला आत्रेयीच्या ऋचा इंद्राला उद्देशून आहेत. तिच्या काव्यात उपचार, परिवर्तन आणि वैयक्तिक प्रार्थनेचे स्वर दिसतात.
रोमाशा

रोमाशा ही देखील ऋग्वेदातील ऋषिकांपैकी एक म्हणून नोंदली जाते. तिचं नाव वैदिक परंपरेतील स्त्री बौद्धिकतेची उपस्थिती दर्शवतं.
विश्ववारा

विश्ववारा आत्रेयीने अग्नीवरील एक ऋचा रचल्याचे मानले जाते. तिच्या मंत्रांत यज्ञातील अग्नीचे प्रतीकात्मक महत्त्व दिसून येते.
शाश्वती

शाश्वतीचं नावही ऋग्वेद परंपरेत जतन झालेल्या स्त्री ऋषिकांमध्ये आढळतं. तिच्या नावाचा उल्लेखच स्त्रियांच्या आध्यात्मिक स्थानाची साक्ष देतो.
या ऋषिका केवळ अपवाद नव्हत्या. त्या वैदिक ज्ञानपरंपरेतील मान्यताप्राप्त आवाज होत्या.
गार्गी आणि मैत्रेयी: उपनिषद काळातील महिला तत्त्वज्ञ
वैदिक विचार पुढे उपनिषद काळात अधिक तात्त्विक झाला.
याच काळात गार्गी आणि मैत्रेयी कथा विशेष उल्लेखनीय ठरते.
गार्गी वाचक्नवी
राजा जनकाच्या दरबारात आयोजित तत्त्वचर्चेत अनेक विद्वान उपस्थित होते. त्यात गार्गी वाचक्नवी हीही सहभागी होती.
तिने ऋषी याज्ञवल्क्यांना विश्वाच्या अंतिम तत्त्वाबद्दल प्रश्न विचारले.
“या विश्वाला आधार काय आहे?”“सर्व अस्तित्वाच्या पाठीमागे कोणते तत्त्व आहे?”
तिचे प्रश्न अत्यंत गूढ तत्त्वज्ञानाशी संबंधित होते.ही चर्चा दर्शवते की स्त्रिया त्या काळात बौद्धिक वादसंवादात सक्रिय होत्या.

गार्गी आणि मैत्रेयींची कथा ही केवळ कथा नसून तत्त्वचिंतनात्मक संवादाचे नोंदवलेले उदाहरण आहे.
मैत्रेयी
मैत्रेयी ही याज्ञवल्क्यांची पत्नी होती. एकदा याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि संपत्ती वाटून देण्याची तयारी दर्शवली.
तेव्हा मैत्रेयीने एक प्रश्न विचारला:
“संपत्तीने अमरत्व मिळेल का?”
उत्तर नकारार्थी होतं. मग तिने संपत्तीऐवजी आत्मज्ञानाची मागणी केली.
या संवादातून आत्मा (आत्मन्) आणि अमरत्वावर गहन तात्त्विक चर्चा घडते.
ही कथा प्रतीकात्मक नसून तत्त्वज्ञानातील प्रत्यक्ष सहभाग दाखवते.
वेद आणि उपनिषदांमधील उल्लेखनीय स्त्रिया
लोपामुद्रा - ऋग्वेदातील सूक्तांची रचयित्री
घोषा - भक्तिपर सूक्तांची रचना करणारी विदुषी
अपाला - आरोग्य आणि उपचाराशी संबंधित सूक्तांशी संबंधित ऋषिका
गार्गी वाचक्नवी - बृहदारण्यक उपनिषदातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ
मैत्रेयी - उपनिषदांतील आत्मज्ञानाच्या शोधासाठी ओळखली जाणारी विदुषी
वैदिक शिक्षण आणि विधींमध्ये स्त्रियांची भूमिका
वैदिक ग्रंथांमध्ये ब्रह्मवादिनी हा शब्दही आढळतो. ब्रह्मवादिनी म्हणजे वेदांचा अभ्यास करणारी आणि ब्रह्मज्ञानावर चिंतन करणारी स्त्री.
काही संदर्भांनुसार, काही कुटुंबांमध्ये मुलींनाही विवाहापूर्वी वैदिक शिक्षण दिले जात असे.
यज्ञविधींमध्ये स्त्रियांची उपस्थिती पूर्णपणे निषिद्ध नव्हती. याचा अर्थ असा नाही की त्या काळात समाज पूर्णपणे समान होता. परिस्थिती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगळी असू शकते.
परंतु वैदिक ग्रंथ स्त्रियांच्या आध्यात्मिक पात्रतेला नाकारत नाहीत.
नंतर काय बदललं?
काळ जसजसा पुढे गेला, तसतशी समाजरचना बदलत गेली.
राजकीय बदल, सामाजिक परिस्थिती, आणि आर्थिक घटक यांचा परिणाम सामाजिक नियमांवर झाला.
या काळात निर्माण झालेले स्मृती ग्रंथ समाजजीवनासाठी मार्गदर्शक होते.
येथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा लागतो:
श्रुती - वेद आणि उपनिषद (मूल आध्यात्मिक ज्ञान)
स्मृती - सामाजिक नियम व आचारसंहिता
काही नंतरच्या व्याख्यांमध्ये स्त्रियांच्या भूमिकेवर मर्यादा आल्या.परंतु त्या मर्यादा थेट वैदिक ग्रंथांवर लादणे योग्य नाही.
म्हणून वैदिक काळातील स्त्रिया या विषयाकडे पाहताना ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचा ठरतो.
आजच्या काळातील महत्त्व
आज महिला सक्षमीकरणाच्या चर्चा अनेकदा परंपरेपासून वेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात.
परंतु प्राचीन भारतातील काही स्त्रियांचे उदाहरण सांगते की ज्ञान आणि बौद्धिक स्वातंत्र्याची परंपरा खूप जुनी आहे.
वैदिक काळातील स्त्रियांनी संघर्षाऐवजी ज्ञान, स्पष्टता आणि संवादातून आपली भूमिका निर्माण केली.
महिला दिनाच्या निमित्ताने ही परंपरा आठवणे म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील नातं पुन्हा जोडणं होय.
आधुनिक समाजासाठी वैदिक स्त्रियांचे धडे
गार्गी आपल्याला आदरपूर्वक पण ठामपणे प्रश्न विचारण्याचे महत्त्व शिकवते. शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात धैर्य आणि शिस्त यांचा संगम संवाद अधिक मजबूत बनवतो.
बौद्धिक धैर्य
गार्गी शिकवते की आदर राखूनही कठोर प्रश्न विचारता येतात.
आध्यात्मिक प्राधान्य
मैत्रेयी दाखवते की केवळ भौतिक यश पुरेसं नसतं.
स्वतःचा आवाज
ऋषिका दर्शवतात की वैयक्तिक अनुभव आणि आध्यात्मिकता यांचा संगम शक्य आहे.
संवादात सहभाग
वैदिक परंपरेत स्त्रिया ज्ञानचर्चेच्या बाहेर नव्हत्या. आधुनिक समाजालाही हीच खुली दृष्टी आवश्यक आहे.
या शिकवणीसाठी भूतकाळाचे रोमँटीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी उपलब्ध स्रोतांचे काळजीपूर्वक वाचन आणि त्या विचारांचा विचारपूर्वक उपयोग करणे अधिक महत्त्वाचे आहे.
विस्मृतीत गेलेले आवाज पुन्हा ऐकताना
वेदांनी स्त्रियांना गप्प बसवलं नाही. त्यांनी त्यांच्या ऋचा जतन केल्या. त्यांच्या प्रश्नांची नोंद ठेवली.
काही वेळा आपण “विस्मृतीत गेलेले आवाज” म्हणतो ते खरंतर कधीच नष्ट झाले नव्हते.
ते ग्रंथांमध्येच होते - पुन्हा वाचले जाण्याची वाट पाहत.
वैदिक काळातील स्त्रिया आपल्याला सांगतात की भारतीय परंपरेत स्त्रीबुद्धीला स्थान होते.
कदाचित आज आपल्याला नवीन सक्षमीकरण निर्माण करण्याची गरज नाही.
कदाचित आपल्याला फक्त पुन्हा ऐकण्याची गरज आहे.
जेव्हा आपण एखाद्या ऋषिकेची ऋचा किंवा गार्गीचा प्रश्न वाचतो,तेव्हा आपल्याला अनुपस्थिती दिसत नाही - उपस्थिती दिसते.
आणि त्या उपस्थितीत भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला संवाद पुन्हा जिवंत होतो.
FAQs
Were women allowed to study the Vedas in ancient India?
Yes, evidence from early Vedic literature suggests that some women studied and composed Vedic hymns. Female seers known as Rishikas are credited with hymns in the Rigveda. Later texts refer to Brahmavadinis, women devoted to the study of Brahman and Vedic knowledge. While social conditions varied across periods, spiritual eligibility was not categorically denied in early Vedic sources.
Who were the female sages in the Vedas?
Several female sages, or Rishikas, are mentioned in the Rigveda. Notable examples include Lopamudra, Ghosha, and Apala, who are credited with composing hymns. In the Upanishadic period, Gargi Vachaknavi and Maitreyi engaged in philosophical dialogues on ultimate reality and the nature of the Self. Their contributions are preserved in primary scriptural texts.
What is the role of Gargi and Maitreyi in the Upanishads?
Gargi Vachaknavi appears in the Brihadaranyaka Upanishad as a philosopher who publicly debates sage Yajnavalkya on metaphysical questions about ultimate reality. Maitreyi, also in the same Upanishad, asks whether wealth can grant immortality and seeks knowledge of the Self instead. Both represent documented intellectual participation in Upanishadic philosophy.
What is a Brahmavadini?
A Brahmavadini was a woman devoted to the study of Brahman and Vedic knowledge. Traditional sources indicate that some women pursued Vedic education before marriage and participated in sacred discourse. The term reflects recognition of women engaged in spiritual inquiry, not merely domestic roles.
Did later texts restrict women more than the early Vedas?
Yes, historical development shows that later Smriti texts addressed changing social conditions and sometimes limited women’s public participation. However, Shruti texts such as the Vedas and Upanishads preserve accounts of women as composers and philosophers. It is important to distinguish between early scriptural sources and later socio-legal codes when discussing women’s status in ancient India.










Comments